Posts

Showing posts from January, 2024

सुरूवात शिकायची.....

स एक आई तिच्या साडेतीन वर्षाच्या मुलीला घेऊन आली होती.मी विचारलं," काय समस्या आहे?" तर ती म्हणली," डॉक्टट,अहो ही अभ्यास करतच नाही" मी विचारलं,"वय किती या चिमुकलीचं?"उत्तर आलं,"साडेतीन आहे" मी मनातल्या मनात कपाळाला हात मारला!! साडेतीन वर्षाची" प्ले ग्रूप " मध्ये जाणार्या मुलीला अभ्यास शिकवला जातो व तो करण्याची पालक पण अपेक्षा करतात यापेक्षा आपल्या शिक्षण व्यवस्थेची दुर्दशा व मुलांचे दुर्दैव ते कोणते? नावातच प्ले ग्रूप असा शब्द असताना (फॉर्मल एज्युकेशन)औपचारिक  शिक्षण अपेक्षितच नाही.असं असताना तो घेतला जातो व पालक पण तशी अपेक्षा ठेवत असतील तर तो मुलांवर अन्याय आहे! हसत खेळत,इतर मुलांशी हळूहळू ओळख करत गाणी,गोष्टी शिकणं व फारतर तोंडी अंक/अक्षर ओळख होणं एवढंच त्या बालवाडी किंवा प्ले ग्रूप,नर्सरी मधे  व्हायला हवं.पण आजकाल गर्भावस्थेतच आयांनी शाळेत जाऊन " अभिमन्यू" घडवणं एवढंच बाकी राहिलंय! खरंतर प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच व्हायला हवं.आपण स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना केली पण त्या त्या राज्याच्या भाषेतून/मातृभाषेतून शिक्ष...

सुरूवात..अस्तित्वाची..विकासाची

  गर्भधारणा झाल्यानंतर त्या गर्भात जेव्हा हृदयाची हालचाल दिसायला लागते त्या क्षणी आपल्या /त्या जीवाच्या अस्तित्वाला खर्या अर्थाने सुरूवात होते आणि मग ९ महिने त्या गर्भाची वाढ होऊन मग आईच्या उदरातून बाहेरच्या जगात ट्यॅ हॅ फोडत बाहेरच्या जगात जगण्याची सुरूवात होते.हे ९ महिने या सुरूवातीच्या विकासासाठी खूप महत्वाचे असतात. मुळात जी गर्भधारणा झाली आहे त्याविषयीच्या त्या आईच्या भावना  सकारात्मक असतील,म्हणजेच ती लादली गेली नसणं,मनापासून त्या गर्भाचं स्वागत झालं असणं खूप आवश्यक आहे.एकूणच त्या संपूर्ण काळात आईच्या शारिरीक काळजीबरोबरच मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे खूप आवश्यक असते,काळजी इतरांबरोबरच त्या आईने सुद्धा घ्यायला हवी! म्हणजे शक्यतो आपले दैनंदिन काम चालू ठेवून(डॉ चा बेडरेस्टचा सल्ला असेल तर अर्थात त्याप्रमाणे)जोडीला ध्यानधारणा,संगीत /वाद्य ऐकणे/वाजवणे,विविध पुस्तकांचे वाचन करणे,जोडीने चालायला जाणे,गर्भाशी संवाद साधणे,पतीपत्नी व कुटुंबियांनी सुसंवाद साधणे/गप्पा मारणे अशा गोष्टी केल्याने मन आरोग्य चांगले रहाण्यास मदत होते व गर्भाची चांगली वाढ होण्यास मदत होते.याकाळात तरीही एखादील...

सुरूवात!!

  काल २०२४ ची सुरूवात झाली,हे आंग्ल नववर्ष सुरू झाले.अनेकजणांनी नाचून गाऊन,खाऊन पिऊन तर काहींनी पिऊन खाऊन केली, पण आंग्लभाषा ही जगावर राज्य करणारी असल्याने मनात असो वा नसो या वर्षाची सुरूवात करावीच व मानावी पण लागते हे कटू सत्य आहे. वर्षाची सुरूवात करताना अनेक जण चांगल्या बदलांचे संकल्प करतात पण त्यातले किती टिकतात हे सुद्धा सर्वांना माहिती असते.माझ्या ब्लॉगची पण ही सुरूवातच आहे आणि ते सुरू राहिल असा मला विश्वास आहे! नमनालाच घडाभर तेल झालं की! पण सुरूवात नेहमी त्या निर्गुणाचा आरंभ असलेल्या श्रीगणेशाला वंदन करून करत असतो,माझाही नमस्कार त्या गणरायाला!!  आपल्याकडे अशा अनेक प्ररकल्पांची घोषणा होते,भूमिपूजनही होते पण अनेकदा मधेच घोडं कुठे पेंड खातं काही कळत नाही.पूर्ण झाले तरी उद्घाटन कोणा थोराच्या हस्ते केल्याशिवाय होत नाही,परदेशात असं काही होताना दिसंत नाही.उद्घाटन कोण करणार,नाव काय देणार यावरून रंगणार्या वादांची तर गणतीच नाही! काही जण सुरूवात करायलाच वेळ घेतात,थोड्या वेळाने करतो/ते असं त्यांचं म्हणणं असतं,ज्याला इंग्रजीत Procrastination असं म्हहणतात.बहुतांश कुमारवयीन मुलांमधे ही...