सुरूवात!!
काल २०२४ ची सुरूवात झाली,हे आंग्ल नववर्ष सुरू झाले.अनेकजणांनी नाचून गाऊन,खाऊन पिऊन तर काहींनी पिऊन खाऊन केली, पण आंग्लभाषा ही जगावर राज्य करणारी असल्याने मनात असो वा नसो या वर्षाची सुरूवात करावीच व मानावी पण लागते हे कटू सत्य आहे.
वर्षाची सुरूवात करताना अनेक जण चांगल्या बदलांचे संकल्प करतात पण त्यातले किती टिकतात हे सुद्धा सर्वांना माहिती असते.माझ्या ब्लॉगची पण ही सुरूवातच आहे आणि ते सुरू राहिल असा मला विश्वास आहे!
नमनालाच घडाभर तेल झालं की! पण सुरूवात नेहमी त्या निर्गुणाचा आरंभ असलेल्या श्रीगणेशाला वंदन करून करत असतो,माझाही नमस्कार त्या गणरायाला!!
आपल्याकडे अशा अनेक प्ररकल्पांची घोषणा होते,भूमिपूजनही होते पण अनेकदा मधेच घोडं कुठे पेंड खातं काही कळत नाही.पूर्ण झाले तरी उद्घाटन कोणा थोराच्या हस्ते केल्याशिवाय होत नाही,परदेशात असं काही होताना दिसंत नाही.उद्घाटन कोण करणार,नाव काय देणार यावरून रंगणार्या वादांची तर गणतीच नाही!
काही जण सुरूवात करायलाच वेळ घेतात,थोड्या वेळाने करतो/ते असं त्यांचं म्हणणं असतं,ज्याला इंग्रजीत Procrastination असं म्हहणतात.बहुतांश कुमारवयीन मुलांमधे ही समस्या आढळून येते,आपण आळस या सदराखाली ती झाकतो,कारणांचा ऊहापोह करण्याची ही जागा नाही पण असं सातत्यानं दिसंत असेल व त्यामुळे त्या मुला/मुलीच्या प्रगतीवर परिणाम होत असेल तर मानसतज्ञांची मदत घ्यायला हवी!!
अनेकदा नैराश्यामुळे सुरूवात केली जात नाही,केली तरी त्यात सातत्य राहू शकत नाही त्यासाठी पण मानसतज्ञ मदत करू शकतात! व्यसनमुक्त होण्याची सुरूवात पण १ जानेवारीला (३१ ला कोटा संपवून!)करावीशी वाटते,शेवटी वाटणं महत्वाचं असलं तरी त्या मार्गावर टिकून रहाणं कठीण असतं,"आजचा दिवस मी लांब राहिन' असा मंत्रं/निशचय रोज जपून व मानसतज्ञांची मदत घेऊन मुक्तीच्या मार्गावर टिकून रहाणे महत्वाचे!
थोडक्यात काय तर सुरूवात करणं व सुरू केलेल्या गोष्टीत सातत्य ठेवणं वा वाढ करणं दोन्ही महत्वाचं आहे!!
चला,ब्लॉगची सुरूवात तर झाली !!
-----डॉ अद्वैत पाध्ये
खूप छान अद्वैत..ब्लॉग लेखन सुरू केल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.. असाच लिहिता राहा आणि आम्हाला छान छान वाचायला आवडेल,आनंद होईल.
ReplyDeleteआज याची खरी गरज आहे..परत एकदा शुभेच्छा
छान सुरुवात आहे. आपल्या विवेचनातून सर्वांना उपयुक्त व चांगली शास्त्रीय माहिती मिळेल. या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
ReplyDeleteमला वाटते 1 जानेवारी पासून सुरू होणारे वर्ष हे आंग्ल कॅलेंडर नुसार नसून Gregorian कॅलेंडर प्रमाणे आहे. त्याचा आंग्ल म्हणजे इंग्रजी भाषेशी काही संबंध नाही. एखाद्या भाषेशीच त्याचा संबंध जर लावायचा असेल तर तो इटालियन भाषेशी लावावा लागेल. कारण ग्रेगोरियन कॅलेंडर सोळाव्या शतकात आधीच्या Julian कॅलेंडरची सुधारित आवृत्ती म्हणून इटाली मध्ये वापरण्यास सुरुवात झाली.
अद्वैत.... अतीशय सुंदर. लिहित रहा.
ReplyDeleteछान सुरवात. असेच चालू ठेव .हार्दिक शुभेच्छा तुझ्या उपक्रमासाठी.
ReplyDelete